शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वार्ता|

विश्वासदर्शक ठराव जिंकणारे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून एक नवा इतिहास रचला. विश्वासदर्शक ठराव जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

देशाच्या संसदीय इतिहासात आजपर्यंत पाच पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. पण तो जिंकण्यात त्या सर्वांना अपयश आले. मोरारजी देसाई, चरणसिंह, विश्वनाथ प्रताप सिंह, एच. डी. देवेगौडा व अटलबिहारी वाजपेयी हे ते पंतप्रधान होत.

मोरारजी देसाई यांनी आपल्याविरोधातील स्थिती लक्षात येताच मतदानापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर चरणसिंह यांना बहूमत सिद्ध करायचे होते. पण त्यांनीही त्यापूर्वीच राजीनामा दिला. विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार भाजप व कॉंग्रेसने विरोधात मतदान केल्याने पडले.

देवेगौडा यांनीही कॉंग्रेसचा पाठिंबा न मिळाल्याने राजीनामा दिला होता. वाजपेयी यांनी १९९६ मध्ये मतदानापूर्वी राजीनामा दिला होता, तर ९८ मध्ये त्यांचे सरकार एका मताने हरले होते.