मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2008 (20:32 IST)

विश्वासमतावर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

सपुआ सरकारने मांडलेल्या विश्वासमत ठरावावर लोकसभेत मतदान झाले असून इलेक्ट्रॉनिक मतदानात एकूण 487 सदस्यांनी मतदान केले असून सरकारच्या बाजूने 253 मते तर विरोधात 232 मते पडली.

इलेक्ट्रीनिक मतदानात सरकारने आघाडी घेतली आहे. मात्र नऊ सदस्यांची मतदानासाठी स्लिप मागितली असून बारा खासदार लॉबीत आहेत. अंतिम मतमोजणी झाल्यानंतर सरकारने विश्वासमत जिंकले किंवा नाही याबाबतचा निर्णय लोकसभाध्यक्ष जाहीर करतील.