रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:03 IST)

राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. 
 
दिवसभरात राज्यातील १७ हजार २५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याचा रिकव्हरी रेट ८०.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ७२ लाख ४१ हजार ३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ६५ हजार ९११ (२०.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात २ लाख ४७ हजार ०२३ Active रुग्ण आहेत.