शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 20 मे 2020 (08:40 IST)

दिलासा : एकाच दिवसांत 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब समोर येत आहे. एकाच दिवसांत राज्यात 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. एकाच दिवसांत 1200 रुग्ण बरे झाल्याची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्के इतका असून राज्याचा मृत्यू दर हा 3.2 टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
राज्यात दिवसभरात 15 हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी 67 प्रयोगशाळा काम करत आहेत. राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी साधनांची कमी नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर्सची उभारणी केली जात आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारलामालेगावातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी तेथील मृत्यूदर कमी होत असल्याचं सांगितलं. तेथे खासगी दवाखाने बंद असल्याच्या काळात मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. मात्र तेथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली, त्यांना विश्वासात घेतल्यानंतर खासगी दवाखाने सुरु झाले. आता त्याचे परिणाम दिसू लागले असून मृत्यू दर खाली आला आहे.