सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (16:02 IST)

पुण्यात 283 नव्या रुग्णांची नोंद; 268 कोरोनामुक्त

पुण्यात शनिवारी 283 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची तर 268 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पालिका हद्दीत 11 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 680 इतकी झाली आहे. शहरात 229  गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3042 झाली आहे.
 
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 83 हजार 199 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 71 हजार 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात एकाच दिवसात 7 हजार 950 नमुने घेण्यात आले आहेत.
 
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.तोंडाला मास्क,हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.