बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)

राज्यात ७ हजार ३४७ नवे रुग्ण दाखल

राज्यात शुक्रवारी ७ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून १८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ३२ हजार ५४४ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. तसेच आज दिवसभरात राज्यातील १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यातील १४ लाख ४५ हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्के एवढे झाले आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ (१९.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ३८ हजार २४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार ५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.