मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (19:34 IST)

डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी करावी. खाटांच्या उपलब्धतेविषयी सतर्क राहावे. अशा प्रकारच्या सूचना या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला केल्या आहेत.  यासोबतच पालिकेने उभे केलेले ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, रुग्णालयातील सुधारणा, खाटांचे नियोजन आणि कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होण्यासंदर्भात राबविलेल्या उपाययोजनांविषयी या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
 
केंद्र शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका सक्षमपणे काम करीत असल्याचे निरीक्षण या शिष्टमंडळाने नोंदवले. यासंदर्भात शिष्टमंडळातील सदस्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पुण्यामध्ये समाधानकारक काम झाल्याचे सांगितले. पुण्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी गेल्या चार दिवसात पुण्यातील विविध कोविड सेंटरमध्ये भेट दिली. शहरातील उपाययोजनांची माहिती घेऊन महापालिकेत बैठका घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.