Daily Horoscope
✕

साई संस्थानला एक कोटी ९० लाख रुपयांची देणगी

Updated: सोमवार, 6 एप्रिल 2020 (12:38 IST)
 
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ही माहिती दिली. गर्दी टाळणं हा करोनाशी लढण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन होण्याआधीच राज्यातील अनेक देवस्थानांनी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डीच्या साई संस्थानानंही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. दर्शन सोडाच, लॉकडाऊननंतर साईभक्तांना शिर्डीला येणं अशक्य आहे. असं असलं तरी साईभक्तांनी ऑनलाइन पद्धतीनं देणगी देणं सुरूच ठेवले आहे.
 
याबाबत बोलताना डोंगरे म्हणाले, ‘साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवण संपूर्ण जगात पोहचलेली आहे. देशात आणि परदेशातही त्यांचे असंख्य भक्त आहे. मंदिर बंद असले तरी साईंचे ऑनलाइन दर्शन सुरू आहे. संस्‍थानाचे संकेतस्‍थळ व मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घर बसल्‍या घेत आहेत. हे दर्शन घेताना साईभक्त मोठ्या श्रद्धेनं साईचरणी दान अर्पण करत आहेत. त्यामुळं गेल्या अठरा दिवसांत १ कोटी ९० लाख २०१ रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.’

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इजिप्तमध्ये तेलाच्या टँकरला लागलेल्या भीषण आगीत ३१ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या मिसिसिपी किनाऱ्याजवळ विमान अपघात; एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दिलासा, ५ किलो मोफत धान्य मिळणार

पुण्यात अनियंत्रित भरधाव ट्रकने बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले; तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

"आधी विधेयक सादर होऊ द्या; कदाचित ते अधिक चांगले होऊ शकते,"सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेवर एक मोठे विधान केले

पुढील लेख
Show comments