मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (17:11 IST)

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार

दिल्लीमध्ये मुलाने आपल्या वडिलांविरूद्ध लॉकडाऊनचं उल्लंघन करत असल्यामुळे एफआयआर दाखल केली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीत एका मुलाने वडिलांनी लॉकडाऊनचं पालन न केल्यामुळे वडिलांविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. वसंत कुंज दक्षिण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलाने असं सांगितलं आहे की, त्याचे वडील दररोज सकाळी ८ वाजता घराबाहेर पडतात. अनेक वेळा समजावून सांगूनही ते घरात राहत नाहीत. मी सतत वडिलांना कोरोना विषाणूच्याबाबतीत, लॉकडाऊनच्या नियमांविषयी माहिती देत असतो, परंतु वडील त्याकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहेत, असं या युवकाचे म्हणणं आहे.
 
या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आणि ५९ वर्षीय व्यक्तीला समजावण्यासाठी स्वत: पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले की सध्या कलम १४४ लागू आहे आणि लॉकडाऊनदेखील आहे. त्यामुळे कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. परंतु पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतरही तरुणाचे वडील ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला.