गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (21:01 IST)

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वाढविण्याचा प्रयत्न होत आहे : दरेकर

allegation was made by Pravin Darekar
कोरोनाची काळजी घेत आपल्याला अधिवेशन चालवता येतं, पण सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न दिसत आहे. सगळ्या तपासण्यांची चौकशी व्हायला हवी, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. 
 
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तेथील एका जिल्हा परिषद सदस्याने जाणीवपूर्वक कोरोना पॉझिटीव्ही अहवाल दिला जात असल्याचा आरोप केला आहे. दरेकर यांनीही या आरोपाप्रमाणेच मलाही संशय वाटत असल्याचं म्हटलंय. तपासण्या वाढल्या, पण आता चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे, कोरोना आणि अधिवेशन असा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. एकाचवेळी सगळे मंत्री, मंत्रालयाचा एक विभाग, उद्या दुसरा विभाग, आज अमरावती उद्या यवतमाळ... याच्या चौकशीची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी म्हटले. कोरोनाचे निर्मूलन झाले पाहिजे, नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. पण, आपण कोणत्या नैतिकतेच्या आधारावर म्हणताय. कारण, सरकारमधील एका मंत्री 8 ते 10 हजार लोकांना एकत्र घेऊन जमतो, तिथे कुठलेही मास्क नसतात की सोशल डिस्टनही नसतं, असे म्हणत संजय राठोड यांनी पोहोरादेवी येथे जमवलेल्या गर्दीवरुनही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.