गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (21:48 IST)

नाशिक सावधान! जिल्ह्यात कोरोनाचे आज ‘इतके’ रुग्ण वाढले

corona
नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन अठरा रुग्ण सापडले असून आत्तापर्यंत 55 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
गुरुवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने कोरोनाच्या स्थितीबाबत दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे, की आतापर्यंत 55 रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे नाशिक शहरामध्ये 11, नाशिक ग्रामीणमध्ये सहा व जिल्हाबाह्य एक रुग्ण आढळून आला असून, या सर्वांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 रुग्ण बरे झाले आहेत.
 
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने केले जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor