एका दिवसात उच्चांकी रूग्णांना कोरोनामुक्ती

corona 18
Last Modified रविवार, 17 मे 2020 (08:28 IST)
देशात शनिवारी पहिल्यांदाच एका दिवसात उच्चांकी २ हजारांहून अधिक जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात २ हजार २३३ कोरोनामुक्त नागरिकांना विविध राज्यातील रूग्णालयातून सुटी देण्यात आली. चिंताजनक बाब म्हणजे एका दिवसात ३ हजार ९७० नवीन संसर्गग्रस्तांची भर पडली आहे. तर, १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक संसर्गग्रस्त दिल्ली, तामिळनाडू, गुजरात तसेच महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा त्यामुळे ८५ हजार ९४० झाला आहे.

आतापर्यंत ३० हजार १५३ जणांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर २ हजार ७५२ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुक्तीचा दर वेगाने वाढत आहे. सध्या हा दर ३५ टक्क्यांच्या घरात आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत देशात २१.३४ लाख वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत.

कोरोना संसर्गासंबंधी देशातील पाच मोठ्या राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. या राज्यातील कोरोनामुक्त तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास पश्चिम बंगाल मधील स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे ३.६ रूग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे. तर, महाराष्ट्रात दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे हे प्रमाण ५.९ एवढे आहे. गुजरातमध्ये ६.४, पंजाबमध्ये ७ तर मध्य प्रदेशात
हे प्रमाण ९.२ एवढे आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही सर्वाधिक आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर ९.१४ पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ समुहाच्या बैठकीत संसर्गग्रस्तांना योग्य सुविधा उपलब्ध करवून देण्याचे निर्देश त्यामुळे राज्याला देण्यात आले होते. बंगाल खालोखाल मेघालयात ७.६९, पॉडिचेरी ७.६९, गुजरात ६.१०, मध्य प्रदेश ५.२० , हिमाचल प्रदेश ३.९५, महाराष्ट्रात ३.६७, तर कर्नाटक मध्ये ३.४१ मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

देशातील कोरोनासंबंधीची आकडेवारी
एकूण रूग्ण
-
८५ हजार ९४०

सक्रिय केस
-

५३ हजार ३५0
कोरोनामुक्त -

३० हजार १५२
मृत्यू

-

२ हजार ७५२


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम लांबणीवर पडले आहे त्यांची छायाचित्रे लटकवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा कामावरील विलंब ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या ...

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण ...

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ...

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड
बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ...