शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (16:33 IST)

CoronaVirus : महाराष्ट्रात या जिल्ह्यात सुरु झाली मास्क सक्ती

Pneumonia
देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर केले असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.अनेक राज्यात सरकारने कोरोना आणि इन्फ्लुएंजाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आदेश जारी केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 248 रुग्ण सोमवारी आढळून आले आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याचे आवाहन करत असून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होता बघून राज्यात सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्याने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात ,बँक मधील कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य केले आहे.साताऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीचा आदेश दिला  आहे. गर्दीच्या ठिकाणी समारंभात मास्कचा वापर करण्याचे आदेश दिले आहे.     
 
Edited By - Priya Dixit