Festival Posters

मुंबईत दारू विक्री मात्र फक्त ऑनलाईन पद्धतीने

शनिवार, 23 मे 2020 (09:14 IST)
मुंबई वगळता अन्य ठिकाणी दारूची दुकाने सुरु असतानाच मुंबईतील मद्यप्रेमींची गैरसोय होत होती. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी करून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडून त्यांना याची विक्री करता येणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मागणीनुसार, ग्राहकांना त्यांच्या घरी सिलबंद मद्याच्या बाटल्यांची विक्री करता येवू शकते. परंतु, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या बाधित क्षेत्रात अथवा सिलबंद इमारतीत या मद्यविक्रीचा पुरवठा करता येवू शकणार नाही, असे आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.
 
याआधी महाराष्ट्र शासनाने ४ मे पासून लॉकडाऊनचा कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथीलीकरणात लोकं अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असा फतवा जारी करत विभागीय सहायक आयुक्तांना यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका दिवसांत दारूची दुकाने बंद करावी लागली होती.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आजपासून सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली बदलली, नवीन नियमांविषयी जाणून घ्या

CBSE Re-evaluation: पोर्टल न उघडल्याने विद्यार्थी नाराज, मंडळाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments