बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:36 IST)

राज्यात दोन हजाराहून कमी रूग्ण, 3,033 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात सोमवारी1 हजार 736 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 033 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज घडीला 32 हजार 115 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 65 लाख 79 हजार 608 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 04 हजार 320 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात 36 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 578 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात आजवर 6 कोटी 03 लाख 03 हजार 740 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 1 हजार 163 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 38 हजार 474 जण होम क्वारंटाईन आहेत.