शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (08:19 IST)

राज्यात 3,783 नवे रुग्ण, 4,364 जणांना डिस्चार्ज

राज्यात बुधवारी  3 हजार 783 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, 4 हजार 364 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, 56 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 07 हजार 930 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 17 हजार 070 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.07 टक्के एवढे झाले आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 49 हजार 034 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 277 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत 5 कोटी 63 लाख 61 हजार 089 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 87 हजार 356 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.