शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:08 IST)

राज्यात 18 हजार 067 नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यात मंगळवारी18 हजार 067 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 113 ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत.
 
राज्यात 36 हजार 281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 74 लाख 33 हजार 633 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.87 टक्के झाले आहे. राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर 1.84 टक्के झाला आहे.
 
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 49 लाख 51 हजार 750 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 77 लाख 53 हजार 548 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 73 हजार 221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 9 लाख 73 हजार 417 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये  आहेत.