बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 23 मार्च 2022 (12:35 IST)

नव्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचे नवे नवे म्युटंट उदभवत आहे. आता भारतात देखील कोरोनाच्या नव्या व्हायरसने एंट्री केली आहे.
भारतात अनेक राज्यात या डेल्टाक्रॉन ची नोंद झाली आहे. सध्या देशात 568 प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कर्नाटक ,तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात ,पश्चिम बंगाल, दिल्ली आणि तेलांगणा येथे कोरोनाच्या नव्या व्हायरसची नोंद झाली आहे. 

या नव्या कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वांच्या चिंतेत भर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सध्या कोरोनाचा हा नवा व्हायरस जगातील सोळा देशात पोहोचला असून ब्रिटनमध्ये या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळले आहे .