मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (12:17 IST)

Omicron BF.7 in India:राज्यात नव्या व्हॅरिएंटची एंट्री,तज्ञांचा इशारा

corona
देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्याने, बहुतेक निर्बंध हटवले जात होते. पण अलीकडेच कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटने पुन्हा सर्वांच्याच चिंता वाढवल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोरोनाचे हे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट आहे. त्याचे नाव BA.5.1.7 आहे आणि हा विषाणू खूप वेगाने पसरतो.राज्यात देखील पुण्यात BQ1 च पहिलं प्रकरणं समोर आलं असून  हे व्हेरियंट BA.5.1.7 चे सब-व्हेरियंट आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.राज्याचे आरोग्य तज्ज्ञ यांनी सांगितलं की सध्या ही प्रकरणे ठाणे, मुंबई आणि रायगड पुरतीच मर्यादित असून येत्या काही दिवसांत खबरदारी न घेतल्यास वाढू शकतात. 
 
लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल केल्यानंतर, देशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक दिवाळी साजरी करण्यासाठी भारतातील लोक उत्साहाने तयारी करत आहेत, परंतु तज्ञांनी दिवाळी, धनत्रयोदशी, वसुबारस आणि भाऊबीज पूर्वीच योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दोन वर्षा नंतर कोरोनासाठीचे लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवल्यानंतर यंदाच्या वर्षी सर्व सण दणक्यात आणि उत्साहात साजरे केले जात आहे. लोकांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून येत आहे. देशात आता कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ने शिरकाव केला असून कोरोनाचे हे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट आहे. त्याचे नाव BA.5.1.7 आहे आणि हा विषाणू खूप वेगाने पसरतो. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वयस्कर आणि आजार असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगितलं आहे. सणासुदीचे दिवस, येणारा हिवाळा या मुळे कोरोनाचे प्रकरण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी कोरोनासाठीची खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला  आहे. 
 
नवीन प्रकारामुळे नवीन लाटेची शक्यता वाढू शकते कारण यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा होतील. कुठेही निर्बंध नाहीत आणि लोक मास्क घालत नाहीत. गर्दीच्या वेळी हा विषाणू पसरला तर तो फक्त 3-4 आठवड्यांत भारताच्या लोकसंख्येमध्ये पसरू शकतो.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शक्य तितक्या कमी लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. वेळोवेळी आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा आणि अंतर ठेवा. सध्या लोक मास्क घालत नाहीत, त्यांनी मास्क घालायला सुरुवात करावी. त्यामुळे ते प्रदूषणही टाळू शकतात. कोणतेही लक्षण दिसल्यास ते सहज घेऊ नका. असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Edited By- Priya Dixit