मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (20:39 IST)

Omicron :कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या रूपाने आली तिसरी लाट, सर्व राज्यांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे

देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. नवीन लहर वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नवीन स्वरूपात आली आहे.  अधिकृत सूत्रांनी शनिवारी ताज्या आकडेवारीच्या आधारे याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी, देशातील फक्त पश्चिमेकडील प्रदेशांना ओमिक्रॉनची लागण होत होती, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये – पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये प्रामुख्याने डेल्टा प्रकाराचे रुग्ण बाहेर येत होते. एका सूत्राने सांगितले की, ताज्या आकडेवारीनुसार, ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहता, असे म्हणता येईल की कोविड-19 ची तिसरी लाट ओमिक्रॉनच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांमध्ये आली आहे.    
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात 1,41,986 नवीन कोरोना संसर्ग आढळले आहेत. यासह एकूण प्रकरणांची संख्या 3,53,68,372 झाली आहे. तर 285 लोक मृत्युमुखी झाले आहे. हे लक्षात घेता, केंद्र सरकारने लोकांना कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आणि मोठ्या प्रमाणात जमाव करणे  टाळण्याचे आवाहन केले आहे. 
तात्पुरती रुग्णालये सुरू करण्याच्या सूचना
केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता उपचाराच्या पायाभूत सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती लक्षात घेता तात्पुरते रुग्णालय बांधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.