शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 24 मार्च 2020 (11:20 IST)

युद्धकाळातही रेल्वे बंद नव्हती यावरून गांभीर्य लक्षात घ्या, रेल्वेची कळकळीची विनंती

करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले असून अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आले आहे. सरकारकडून एवढे कठिण पाऊल उचलले जात असतानाही जनता सरकारी निर्णय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांकडून जनतेला वारंवार घरात राहण्याचे आवहान केलं जात असलं तरी अनेक राज्यांमध्ये लोकांना परिस्थितीचं गांर्भीय कळत नाहीये. 
 
लॉकडाउन केल्यानंतरही अनेक शहरांच्या बाजारांमध्ये लोक मोठ्या संख्येने दिसून येत आहे.
 
तसेच सरकारने ट्रेनने प्रवास करु नका असं आवाहन केल्यावर देखील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. अखेर 22 मार्च रोजी सरकारने रेल्वे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर रेल्वेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहान भारतीय नागरिकांना केलं आहे. यासाठी रेल्वेचेच उदाहरण देण्यात आलं आहे.
 
अगदी कमी शब्दात जनतेला समजवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रात्री सव्वाबारा वाजता रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, भारतीय रेल्वे युद्धाच्या काळातही कधी थांबली नव्हती. कृपा करुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि घरीच थांबा, असं म्हटलं आहे.
 
भारतीय रेल कभी युद्धकाल में भी नहीं रुकी
कृपया परिस्थितियों की गम्भीरता समझिए
घर में ही रहिये।

अवघ्या काही तासांमध्ये हजारों लोकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. आणि हे आवाहन सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.