रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (11:36 IST)

काय सांगता,तरुणाला कोरोनाचे दोन्ही डोस वेगळे दिले

कोरोनाच्या लसीकरणाचे मोहीम देशात राबविले जात आहे.कोवॅक्सीन आणि कोव्हीशील्ड या दोन्ही लसींना मान्यता दिली गेली आहे.लसीकरण केंद्रावर दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहे.कोरोना प्रतिबंधक लसींचा मिक्सिंग आणि मॅचिंग ला सध्या भारत सरकारकडून मान्यता दिली नाही.दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस चे दोन वेगवेगळे डोस देण्याची घटना हरियाणातील गुरुग्रामच्या एका तरुणासोबत गुरुग्रामच्या लसीकरण केंद्रात घडली आहे.
 
या तरुणाने 8 जून रोजी कोवॅक्सीनचे पहिले डोस घेतले होते.त्यानंतर तो तरुण दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचला.त्याने कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखवले.तरी ही त्या तरुणाला कोवॅक्सीन ऐवजी कोव्हीशील्डचा दुसरा डोस देण्यात आला.
 
घडलेला प्रकारामुळे तरुण घाबरला आणि त्याने त्वरित ट्विट करून 'मला पहिला डोस कॉव्हॅक्सिनचा लागला होता परंतु कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवून देखील मला कोव्हीशील्ड च दुसरे डोस लावण्यात आले.कृपया सांगा आता मी काय करावं.'असे ट्विट केले आहे.