शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (16:23 IST)

मोठी बातमी,आता कोविड लस प्रमाणपत्रात केलेल्या चुका ऑनलाईन सुधारा

नवी दिल्ली. कोविन वेबसाइटवर सरकारने मोठा बदल केला आहे. सरकारने एक नवीन अपडेट जाहीर केले आहे जे अर्जदारास लसीकरण प्रमाणपत्रात छापलेली नावे, जन्मतारखेची तारीख आणि लिंगामधील झालेली चूक सुधारण्यास सवलत देईल.
लस लाभार्थी आता त्यांच्या कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्रात झालेल्या चुकांना  कोव्हिन पोर्टलवर स्वतःच दुरुस्त करु शकतात.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी बुधवारी सांगितले की वापरकर्ते कोवीन वेबसाइटच्या माध्यमातून ही सुधारणा करु शकतात.
 
आरोग्य सेतू ॲपच्या अधिकृत हँडलवर ट्विट केले होते, “कोव्हिन  लसीकरणाच्या प्रमाणपत्रात आपल्या  नावात, जन्मतारीख व लिंगाकडे अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर आपण त्या दुरुस्त करू शकता. कोव्हिनच्या वेबसाइटला भेट द्या आणि या संदर्भात आपली समस्या सामायिक करा.
 
कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्रवासादरम्यान आणि इतर विविध ठिकाणी प्रवासात मदत करतात. यापूर्वी सरकारने आत्म-मूल्यांकन प्रक्रियेद्वारे लसीकरण केलेल्या लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅपवर स्वेच्छेने त्यांची स्थिती अपडेट करण्याची परवानगी दिली होती.
 
ज्या लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे त्यांना होम स्क्रीनवर त्यांच्या लसीकरण स्थितीच्या पुढील बाजूला निळ्या रंगाचे एक टिक दिसतील. आणि ज्यांनी दोन्ही डोस घेतल्या आहेत त्यांना 14 दिवसांनंतर अ‍ॅपवर दोन निळ्या रंगाचे टिक दिसतील. हे दोन्ही टिक कोव्हिन पोर्टलवरून लसीकरणाच्या स्थितीच्या पडताळणी नंतर दिसतील.
 
कॉव्हिनवर नोंदणीसाठी वापरल्या जाणार्‍या मोबाइल नंबरद्वारे लसीकरण स्थिती अपडेट केली जाऊ शकते. देशभरात लसीकरण मोहिमे अंतर्गतआता पर्यंत कोविड -19 च्या एकूण 23,90,58,360 डोस दिले गेले आहेत .