गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (17:45 IST)

ओमिक्रॉन विरुद्ध कोव्हीशील्ड लस अप्रभावी आहे, ते टाळण्याचा एकच मार्ग आहे जाणून घ्या

covishield-vaccine
पुन्हा एकदा जगभरात हाहाकार माजवणारी, ओमिक्रॉन एक नवीन चिंता म्हणून उदयास आली आहे. अशा परिस्थितीत कोव्हशील्ड आणि कोवॅक्सीन कोरोनाच्या या नवीन व्हेरियंट विरुद्ध तितकेच प्रभावी आहेत का, जेवढे डेल्टा प्रकाराविरुद्ध होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन अभ्यास सूचित करतो की कोविशील्डचे दोन्ही डोस ओमिक्रॉन विरूद्ध प्रभावी नाहीत. यापूर्वी कोवॅक्सीनबाबतही असाच अहवाल समोर आला होता.
 
एकंदरीत, दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉन आणि त्याचे सब व्हेरियंट तुम्हाला खूप आजारी बनवू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांना टाळण्यासाठी बूस्टर डोसचा सल्ला देण्यात आला आहे. ICMR च्या तज्ञांनी देखील सहमती दर्शवली आहे की जे लोक कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन  या दोन्ही डोससाठी निर्धारित वेळेत पोहोचले असल्यास, त्यांनी बूस्टर डोस घ्यावा.
 
केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉन चा परिणाम व्यक्तीमध्ये दिसून येतो. एवढेच नाही तर ओमिक्रॉन BA.1 या नवीन व्हेरियंटमुळे शरीरातील अँटीबॉडीजवर परिणाम होत आहे. पण बूस्टर डोस घेतल्यास, मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज या प्रकाराविरूद्ध प्रभावी होऊ शकतात.