Festival Posters
✕

महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Updated: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:41 IST)
 
अपुऱ्या लस उपलब्धतेमुळे महाराष्ट्रात दि. 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लसी देणे सुरू करणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच महाराष्ट्राला लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या लस नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती कमी झाली आहे.  जेव्हा एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक लसीकरण करतात तेव्हाच कोविड -१९ योग्य प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.
 
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात नऊ कोटी लसींपैकी फक्त दिड कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, ती खूपच कमी आहे. जर आपण लसीकरण गती वाढविले नाही, तर जेव्हा लोक नोकरी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडतात, तेव्हा कोविड -१९ ची तिसरी लाट येऊ शकते.
डिसेंबरमधील कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे लोक बेफिकीर झाले आणि कोविड -१९ ची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली. आपण मोठ्या प्रमाणावर लस दिली नाही तर तिसर्‍या लाटेला आमंत्रण ठरणार आहे.
 
राज्यात एप्रिलमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 15 लाख 53 हजार 922 रुग्णांची नोंद झाली असून 11 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारला 20 मेपूर्वी भारत बायोटेक किंवा सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळण्याची शक्यता नाही.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय पथक दाखल; महाराष्ट्राचा दौरा करणार

ChatGPT केवळ उत्तरेच देणार नाही, तर दाखवून स्पष्टीकरणही देईल! नवीन Intelligent UI वैशिष्ट्य सादर

कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे फळपीक: पपई लागवड

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

पुढील लेख
Show comments