1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (16:24 IST)

महाराष्ट्रात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही

देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, राज्यातील नागरिकांना 1 मे पासून लस मिळणार नाहीये. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना 1 मे पासून लस मिळणार नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 
 
लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे. तरी येत्या 6 महिन्यात 18 ते 44 या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
 
लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध नसल्याने सर्वांचे तात्काळ लसीकरण सुरू होणार नाही. सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. नागरिकांनी Co-win App वर नोंदणी करुनच लसीकरण केंद्रावर जावे असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
 
45 हून अधिक नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र असणार आहे आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र असणार आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.