रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2020 (16:27 IST)

राज्यात दोन हजार ३२५ पोलीसांना कोरोनाबाधित

गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण राज्यात दोन हजार ३२५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाग्रस्त एका पोलीसाने प्राण गमावले असून आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
 
राज्यात दोन हजार ६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ हजार २२८ झाली आहे. तसेच ११६ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन हजार ९८ झाली आहे. आठ हजार ३८१ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने राज्यात आतापर्यंत २६ हजार ९९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले 
आहेत. राज्याचा रुग्ण दुप्पटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार हजार ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.