शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 22 मे 2019 (16:12 IST)

इंग्लंडच्या विश्वचषक संघात जोफ्रा आर्चरचा समावेश

इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडने अंतिम संघात बहुचर्चित खेळाडू जोफ्रा आर्चर याला संधी दिली आहे. इंग्लंडने 15 सदस्यीय प्राथमिक चमू जाहीर केला होता. त्यात अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. 
 
नुकत्याच झालेल्या आयर्लंड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. त्या मालिकांमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर आर्चरला अंतिम संघात संधी मिळाली. त्याच्याबरोबरच लिअम डॉसन आणि जेम्स विन्स या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने प्राथमिक संघात तीन बदल केले आहेत. 
 
बार्बाडोसमध्ये जन्लेल्या 24 वर्षीय आर्चरकडे एकाही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नव्हता. परंतु ससेक्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली. तीन वर्षे देशांतर्गत क्रिकेट हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा पात्रतेचा निकष आहे. तो त्याने मार्च 2017 ध्येच पूर्ण केला. त्यामुळे विश्वचषकाचा संघ निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 23 मे पर्यंत दिलेली मुदत ही त्याच्यासाठी पर्वणी होती. त्यानेमधल्या कालावधीत उत्तम कामगिरी करत संघात स्थान पटकावले. या संघात आधी असलेल्या खेळाडूंपैकी जो डेण्टली, अ‍ॅलेक्स हेल्स आणि डेव्हिड विली यांना डच्चू देण्यात आला आहे.
 
इंग्लंडचा अंति संघ :
 
इॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम कुरन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.