शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (15:21 IST)

Marathi Kavita तुमची इच्छा असो व नसो, बदल हे घडतात

love poem valentine
तुमची इच्छा असो व नसो, बदल हे घडतात,
जे सुरू आहे ते जाऊन नवीन पायंडा ते पाडतात,
जशी गरज असेल तसं तसं बदलत जातं,
कालाय तस्मय नमः, म्हणतं ते ही आत्मसात होतं,
काय बदलत नाही हो?सर्वच गोष्टी बदलतात,
काळाच्या ओघात सर्वच वाहू लागतात,
पण हेचं तर जीवन आहे, निरंतर वाहणे,
मग साचून राहात नाही काही, स्वच्छ होतं जाणे,
माणसं बदलतात, त्यांचे स्वभावही बदलतात,
वस्तू बदलतात, त्या वापरायच्या पद्धतीतही बदल घडतात,
एवढंच काय देवाची मर्जी ही बदलते बरं,
त्याला जेंव्हा जे वाटतं ते तो बदलवून आणतो सारं !
..अश्विनी थत्ते.