रविवार, 19 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (17:02 IST)

Kojagiri Purnima : कोजागिरीचा शीतल चंद्र नभांगणी उगवला

कोजागिरीचा शीतल चंद्र नभांगणी उगवला,
बोचऱ्या थंड वाऱ्याची झुळूकही झोम्बते अंगाला,
पण तरीही हवाहवासा स्पर्श वाटे तो सऱ्यास,
जमती सारे मोकळ्यात , लुटण्या चंद्रबिंबा च्या अमृतास,
लक्ष्मी पुसे आज कोण कोण जागे आजदीशी,
करा अमृत प्राशन ,  करावी कोजागिरी अशी,
पूर्णचंद्राचे रूप बघून  आपण तृप्त होतो,
भुलाबाई चे गाणे सारे, श्रद्धेने म्हणतो,
औषधी गुण आहेत किरणात आज चंद्राच्या,
लाभ घ्यावा त्याचा अन कराव्या कामना निरोगी जीवनाच्या !
..अश्विनी थत्ते.