रविवार, 19 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Updated : बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (11:06 IST)

Kojagiri Purnima 2024 Wishes Marathi: कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

Kojagiri Purnima 2023
* कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
 
* शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* रात्र पौर्णिमेची सजली ही अशी,
नववधू रुपेरी साजात जशी..
दूध आटवूया चंद्र प्रकाशात,
प्रतिबिंब पाहुया चंद्राचे त्यात..
कोजागिरी करू साजरी हर्षाने,
आश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने..
कोजागिरी  पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन..
कोण कोण जागे हे पाहते,
लक्ष्मी दाराशी येऊन..
आजची कोजागिरीची रात्र सुखकारक व
आनंदाची उधळण करणारी जावो हीच सदिच्छा…!
कोजागिरी  पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* आज कोजागिरी पौर्णिमा… 
आजचा दिवस तुमच्यासाठी  सुखकारक आणि 
आनंददायक असावा 
हिच सदिच्छा… 
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, 
उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, 
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती…
 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, 
समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हीच आमची मनोकामना…
कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
 प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या 
आयुष्यात असावा ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* प्रकाश चंद्रमाचा,आस्वाद दुधाचा, 
साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
Edited by - Priya Dixit