IND vs AUS Final :वर्ल्डकप फायनलमध्ये मैदानात शिरला पॅलेस्टाईनचा समर्थक
social media
वर्ल्ड कप फायनलला केलेल्या सुरक्षाव्यवस्थेची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असताना अशा पद्धतीने एक व्यक्ती मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेतलेल्या या व्यक्तीने मैदानावर येऊन विराट कोहलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये एक चाहता मैदानात शिरला आणि त्याने फलंदाज विराट कोहलीच्या दिशेने धाव घेतली आणि विराटला चक्क मागील बाजूने मिठी मारली.या वेळी मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली. या चाहत्यांच्या अंगावरील टीशर्टवर फ्री पॅलेसस्टाईन” असे काहीसे आशयाचे मजकूर लिहिले असे. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
Edited by - Priya Dixit

