शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (10:46 IST)

World Cup 2023 शुबमन गिल हॉस्पिटलमध्ये भरती

World Cup 2023 टीम इंडियासाठी ही बातमी चांगली नाही. कारण शुभमन गिल यांची प्रकृती थोडीशी खालावली आहे. भारतीय सलामीवीराची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. गिल यांच्या प्लेटलेट्समध्ये अचानक घट झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय क्रिकेटपटूच्या प्रकृतीवर आणखी परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.
  
वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियापासून दूर आहे. तो चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला सामना खेळला नाही. तसेच तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचेही ठरले होते. आणि आता रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.
 
गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्या, रुग्णालयात दाखल
डेंग्यूने त्रस्त असलेल्या शुभमन गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तेव्हापासून त्याच्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्यावर सस्पेन्सची टांगती तलवार आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता तोपर्यंत गिल फिट होतील असे वाटत नाही.
 
टीम इंडिया दिल्लीत, शुभमन गिल चेन्नईत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये पहिला सामना खेळल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीत आली होती. पण, तब्येत बिघडल्याने गिलला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली चेन्नईत राहावे लागले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसेल, अशी अपेक्षा होती. पण ताज्या घडामोडीच्या बातम्यांमुळे अहमदाबाद येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात त्याच्या खेळावर छाया पडली आहे.