Festival Posters

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय १५

शिष्यांप्रति गुरु म्हणती । तीर्थें हिंडा सर्वक्षिती । भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥
ते संसृतिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद । गुरु म्हणती निर्विवाद । चला खेद सोडूनियां ॥२॥
वाक्य तादृश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी । म्हणती जावे कोण्या स्थानीं । तें ऐकूनी गुरु बोले ।
सात पुरी धाम चार । बारा ज्योतिर्लिंगें थोर । आचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप ।
आचारावें तीर्थी क्षौर । जसा असे स्वाधिकार । तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम ।
जे कोणी जितुके गाव । तीर्था जाती ठेवूनि भाव । तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तयांचे ।
पाहुनि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम । ऋतु निवर्ततां ग्रीष्म । तीर्थधाम विटाळे ॥७॥
स्वधर्मानें आठ मास । फिरा ठरा चार मास । नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ ।
दोष नच तीरस्थांसी । तीन दिन महानदीसी । अहोरात्र र्‍हदकूपासी । करा ऐसी यात्रा तुम्हीं ।
पाप मोचन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य । श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१॥
इति श्री०प०वा०स०गु० सारे तीर्थयात्रानिरुपणं नाम पंचदशो०

सर्व पहा

घरात पीडा येईल.. जर गुरुवारी ही 7 कामे करत असाल तर थांबवा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बाथरूममध्ये सत्संग ऐकणे पाप की पुण्य? जाणून घ्या प्रेमानंद जी महाराजांचे आश्चर्यकारक उत्तर

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments