Dharma Sangrah

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २१

तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप्‌तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची । सांग कथा प्राग्‌जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥
जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें । तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥
कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥
दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।
सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी । येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥
बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥
विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें । सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥
इति श्री०प०वा०स० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो०

सर्व पहा

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचण्याचे फायदे काय आहेत? कधी वाचावे? नक्की जाणून घ्या

Nirjala Ekadashi 2026: वर्षभरातील २४ एकादशींचे पुण्य देणारे एकमेव व्रत; जाणून घ्या पूजेची सर्वात सोपी आणि अचूक पद्धत

Dhumavati Jayanti 2026 विवाहित स्त्रिया या देवीची पूजा का करत नाहीत? जाणून घ्या पौराणिक कारण

मार्गबन्धुस्तोत्रम् शम्भो महादेव देव, शम्भो महादेव देवेश शम्भो ने करा महादेवाची स्तुती

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments