बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Diwali Gift Ideas या वेळी मित्र आणि नातेवाईकांना या भेटवस्तू द्या

दिवाळीची तयारी जोरात सुरू झाली आहे. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू, कपडे, पादत्राणे आणि भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीत फटाके फोडणे आणि नवीन कपडे घालणे यासोबतच आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे भेटवस्तू. आणि भेटवस्तू घेण्याचा उत्साह केवळ मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही दिसून येतो.
 
बेक्ड हॅम्पर
दिवाळीत मिठाई खाऊन बोर झालेल्या लोकांना आपण बेक हॅम्पर दिलं तर नक्कीच आनंदी होतील. बेक्ड हॅम्परमध्ये आपण चॉकलेट कपकेक, कुकीज असलेले एक अद्भुत गिफ्ट हॅम्पर देऊ शकता.
 
बॉडी केअर प्रॉडक्ट्स
ही अशी भेटवस्तू आहे जी प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना नैसर्गिक घटकांपासून बनवलेली त्वचा आणि शरीर काळजी उत्पादने भेट देऊ शकता. ज्यामध्ये साबणापासून ते केसांचे तेल, आय क्रीम, लिप बाम, बॉडी लोशन, फेशियल टोनर, टोनर इत्यादी अनेक पर्याय आहेत. 
 
स्टाइलिश दागिने
ज्वेलरी हा एक पर्याय आहे जो तुमच्या महिला मैत्रिणीला नक्कीच आवडेल. आणि फक्त मित्रच का? तुम्ही तुमची बहीण, जिवलग मित्र, आई, आंटी इत्यादींना दागिने भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे बजेट कमी असेल तर या दिवाळीत तुमच्या खास महिलांना सोने आणि हिऱ्यांऐवजी हाताने बनवलेले दागिने भेट द्या.
 
फेस्टिव्हल हॅम्पर्स
रेडिमेड हॅम्पर्समध्ये अनेकदा एकाच प्रकाराच्या वस्तू असतात, कधी सजावटीच्या तर कधी मिठाईच्या. त्यापेक्षा आपण स्वत: कस्टमाईज करा. घरी तयार केलेले दिवे, नमकीन, गोड पदार्थ, लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती, आकाशकंदील हे हॅम्पर तयार करु शकता.