मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By
Last Updated : रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (11:26 IST)

भाऊबीज कविता

कळकळ अंतरीची वसते परस्पर ह्रदया,
आज ओवाळींन मी तुजला भाऊराया,
कित्ती भांडणे केली, खोड्या केल्यात कित्तीतरी,
पदार्थ तुझ्या आवडीचा खाता, आठवण येतेच मनांतरी,
नकळत निघते मुखातून, काय काय आवडते तुजला,
नसलास जरी तू तिथे, आवड तुझी ठाऊक रे मजला,
एकच वस्तू लहानपणी वाटून होती घेतली,
आठ्व आज ती येता, पापणी होते ओली,
प्रत्येक भावास एक बहीण असावी,
बहिणीसही हक्काने जावयास एक जागा असावी,
निघतात मग विषय, किस्से बालपणी चे,
तेवढेच हलके होते रे , ओझे मनावरचे!!
..अश्विनी थत्ते.