शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

दिवाळीत कुठे कुठे दिवे लावायला पाहिजे, जाणून घ्या...

दिवाळीत आम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवे लावतो पण बहुतांश लोकांना हे माहीत नसते की कोणत्या जागेवर दिवे लावल्याने काय फायदा होतो. तर आम्ही तुम्हाला सांगत आहो की कोणत्या जागेवर कसल्या प्रकारचे दिवे लावायला पाहिजे :  
 
दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजन करण्या अगोदर मुख्य दारात सरसोच्या तेलाचा दिवा लावायला पाहिजे. जर घरात अंगण असेल तर तुपाचा एक दिवा अंगणात लावायला पाहिजे आणि जर अंगण नसेल तर  ड्राइंगरूम किंवा घराच्या मधोमध तुपाचा दिवा लावायला पाहिजे.  
 
जवळच्या मंदिरात जाऊन दीपदान करायला पाहिजे. तुम्ही पाच किंवा सात तुपाचे दिवे लावून आपल्या ईष्टदेवा शिवाय शिव मंदिरात व इतर मुरत्यांसमोर दिवा लावायला पाहिजे आणि समृद्धीची कामना केली पाहिजे.  
 
दीपावलीच्या संध्याकाळी घराच्या जवळ मुख्य चौरसत्यावर देखील दिवा लावल्याने दिग्पाल प्रसन्न होतात.  
 
लक्ष्मी पूजनानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला पाहिजे. आपले घर आणि घराच्या जवळपास जर अंधार दिसत असेल  तर नि:संकोच तेथे दिवा लावायला पाहिजे.  
 
रात्री शयनकक्षात तुपाचा दिवा लावायला पाहिजे पण तसेच त्यात कपूर देखील ठेवायला पाहिजे. असे केल्याने दांपत्य जीवनात प्रसन्नता कायम राहते.  
 
गृहस्वामिनीला दिवाळीच्या रात्री भोजन तयार करण्या अगोदर दोन दिवे स्वयंपाकघरात लावायला पाहिजे. यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घर भांडारात वाढ होते.  
 
जर तुमच्याजवळ वाहन असेल तर वाहनाजवळ एक दिवा नक्की लावायला पाहिजे.  
 
तिजोरीच्या नजीक कुबेराची प्रार्थनाकरत तिळाच्या तेलाचा दिवा लावायला पाहिजे. असे केल्याने वर्षभर तिजोरी भरलेली असते.  
 
घराजवळ नदी, विहीर,तालाब किंवा कुठल्याही प्रकारचा जलस्रोत असेल तेथे दिवा जरूर लावावा. जर हे शक्य नसेल तर घरात नळ किंवा पाण्याच्या एखाद्या स्रोताजवळ  एक दिवा लावावा.  
 
दीपावलीच्या रात्री घरातील चारी कोपर्‍यात चारमुखी दिवा जरूर लावावा आणि गणपतीला आपल्या चारीबाजुला सुख समृद्धीची कामना करावी.