बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Dhanteras Katha धनत्रयोदशी पौराणिक कथा

Dhanteras Katha धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की त्या भक्ताचे घर धन-धान्याने भरेल. खरं तर कित्येकशे वर्षांपूर्वी, जेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात देव हरले तेव्हा समुद्रमंथन झाले. मंथन दरम्यान बरेच काही बाहेर आले जे आपापसात वाटले गेले. नंतर भगवान धन्वंतरीजी हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले. त्यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेदशास्त्र होते. दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लढू लागले. नंतर भगवान विष्णूने मायेची निर्मिती करून देवांना अमृत पाजले. धनत्रयोदशीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, त्यापैकी दोन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
पहिली कथा
एकेकाळी हेम नावाचा राजा होता, त्याला मुलगा झाला. मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर चार दिवसांनी होईल. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही, पण एकदा एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले.
 
लग्नानंतर नेमके तेच झाले आणि चार दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला. जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला, पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले. नवविवाहित वधूचा विलाप ऐकून यमदूतांनी यमराजांना विनंती केली, हे यमराज अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही उपाय सांगा. यमदेवता म्हणाले हे दूत, अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे, त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो. आश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणार्‍याला अकाली मृत्यूची भीती नसणार. यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात.
 
दुसरी कथा
एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की, मी परत येईपर्यंत इथेच राहा. माता लक्ष्मींचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीची शेते आली. शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसाळ आणि गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मींवर कोपले. शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूंनी म्हटले आणि आता त्यांना 12 वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले. त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या. एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले. असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले. 12 वर्षे झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही, शापामुळे ती 12 वर्षे इथे होत्या, पण शेतकरीला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती. हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा, रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा. या कारणास्तव दरवर्षी तेरसच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली.