गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (17:13 IST)

दिवाळी 2021 लक्ष्मी पूजन विधी, या दिवशी काय करावे जाणून घ्या

दिवाळीला लक्ष्मी पुजनाचे विशेष विधान आहे. या दिवशी संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शुभ मुहुर्तात देवी लक्ष्मी, विघ्नहर्ता भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पुजा आणि आराधना केली जाते. पुराणांच्या अनुसार कार्तिक अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री महालक्ष्मी स्वयं भूलोकात येते आणि प्रत्येक घरात विचारण करते. या काळात जे घर प्रत्येक गोष्टीने स्वच्छ आणि प्रकाशवान असतं तिथे देवी अंश रूपात थांबते. या कारणामुळेच दिवाळीच्या निमित्ताने साफ-सफाई करून विधी पूर्वक पुजन केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा असते. या दिवशी लक्ष्मी पुजनासोबत कुबेर पुजा ही केली जाते. पुजेच्या वेळी ह्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे- 
 
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाआधी घराची साफ-सफाई करावी. 
पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करावा. 
घराच्या दारावर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा.
पुजा स्थळी एक चौरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी- गणपतीची मूर्ती ठेवावी. 
चौरंगाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा.
देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावून, दिवा लावून पाणी, मोळी, तांदूळ, फळ, गुळ, हळदी, गुलाल इत्यादी अर्पित करावा. 
देवी महालक्ष्मीची स्तुती करावी.
या सोबतच देवी सरस्वती, काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवाची ही पुजा विधान पूर्वक करावी.
लक्ष्मी पूजनासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावं.
लक्ष्मी पूजा झाल्यावर तिजोरी, मशिनरी आणि व्यवासायिक उपकरणाची पूजा करावी.
पुजा झाल्यानंतर गरजू लोकांना मिठाई आणि दक्षिणा द्यावी.
 
दिवाळीला काय करावे काय नाही- 
कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्रातःकाळी शरीरावर तेलाची मालिश करुन नंतर अंघोळ करावी. असे मानले जाते की असे केल्याने धन हानी होत नाही.
दिवाळीच्या दिवशी व्यस्कर व लहान मुले सोडून इतर व्यक्तींनी भोजन करू नये.
संध्याकाळी लक्ष्मी पुजनाच्या नंतर भोजन ग्रहण करावं.
दिवाळीच्या दिवशी पूर्वजांचे पूजन करावे आणि त्यांना धूप व भोग अर्पित करावं. 
प्रदोष काळाच्या वेळी हातामध्ये उल्का धारण करुन पित्रांना मार्ग दाखवावा. उल्का म्हणजे दिवा लावून किंवा इतर माध्यमाने अग्नीचा प्रकाश दाखवून पित्रांना मार्ग दाखवा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्ती होते.
दिवाळीच्या नि‍मित्ताने भजन, स्तुती, मंत्र म्हणत घरात उत्सव साजरा केला पाहिजे. असे सांगितले जाते की असे केल्याने घरात व्याप्त दरिद्रता दूर होते.