रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (08:09 IST)

Diwali wishes in Marathi 2022 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

diwali
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना
शुभ दीपावली...
 
आली दिवाळी उजळला देव्हारा
अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ,
समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब,
सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
 
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास...
शुभ दीपावली
 
महालक्ष्मीचे करून पूजन
लावा दीप अंगणी
धन-धान्य आणि सुख-समृद्धी
लाभो तुमच्या जीवनी
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त 
मंगलमय शुभेच्छा...
 
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
 
धनलक्ष्मी
धान्यलक्ष्मी
धैर्यलक्ष्मी
शौर्यलक्ष्मी
विद्यालक्ष्मी
कार्यलक्ष्मी
विजयालक्ष्मी
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली...
 
दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
 
संपू दे अंधार सारा 
उजळू दे आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेस येथे 
वाहू दे आनंद वारे
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
 
उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली