गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By संदीप पारोळेकर|

द्विधा मनाची...

एकाकी भटकतोय
या अनोळखी दुनियेत
सोबतीला नाही कुणी
या एकेरी वाटेत...

दिसत होतं लांबच लांब आकाश
दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण
दिसत होतं एकच झाड
त्याची होती आकाशाकडे मान

माझ्यासारखीच द्विधा त्याची
ही खंत होती मनात
माझ्यासारखं असू नये कोणी
हीच प्रार्थना करतो प्रभू चरणात

रेटता रेटता...
दिसलं एक विसाव्याचं ठिकाण
जाऊन पाहतो तर काय?
माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान

तेथून जावं की थांबावं
हाच होता प्रश्न मनात
कुणी मिळेल जीवाभावाचं
या अनोळखी जगात...