Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dussehra Wishes 2024 दसरा शुभेच्छा

Updated: शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 (00:13 IST)
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना 
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
 
आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी...
 
झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...
 
अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी...
मनापासून खूप खूप शुभेच्छा...
 
झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
 
समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा...
 
सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
विजयादशमीच्या शुभेच्छा...
 
निसर्गाचं दान आपट्याचं पान 
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
 
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे...
विजयादशमीच्या शुभेच्छा...
 
स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा...
 
अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार 
हाच आहे दसऱ्याचा सणवार 
दसरा शुभेच्छा..
 
सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
 
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...

सर्व पहा

Ganesh Mantra: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी गणपतीचे हे मंत्र जप करा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments