Festival Posters

आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाच दिवस चिंतन बैठक

Updated: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (08:48 IST)
 
संघाचे अखिल भारतीय सह संघकार्यवाह मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 2019 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि ही चिंतन बैठक याचा काहीही संबंध नसल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
 
2007 मध्ये धर्मस्थळ येथे चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर 12 वर्षांनी ही बैठक पुणे परिसरात आयोजित केली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहणार आहेतच, याशिवाय क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह, क्षेत्र प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीतील सदस्य असे एकूण 70-80 जण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वैद्य म्हणाले.
 
स्वयंसेवक संघात आणि संघाबरोबर येण्याला अनेकजण उत्सूक आहेत. संघाने तयार केलेल्या वेबसाइटवर 2012 मध्ये 13 हजार “रिक्वेस्ट’आल्या होत्या. त्या वाढत जाऊन आज एक लाख 25 हजार झाल्या आहेत. संपर्काच्या माध्यमातूनही खूप मोठी शक्ती संघ कार्यात येऊ पाहात आहेत. त्या सज्जन शक्तीला सामावून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी काय करता येईल, याचेही चिंतन या बैठकीत होईल असे वैद्य म्हणाले.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

सपा आमदार रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, भाजप आमदार परिणय फुके यांचा दावा

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी चेन्नईतील गरुडा एरोस्पेसच्या संरक्षण ड्रोन कारखान्याला भेट देऊन स्वदेशी तंत्रज्ञानाचा आढावा घेतला

महिलांसाठी एक मजबूत व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे, 'अपराजिता'च्या लाँचप्रसंगी मुकेश अंबानी म्हणाले

उपोषणाचा आज १३ वा दिवस, जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांना इशारा

LIVE: राज्य सरकार कडून नाशिक सिंहस्थ कुंभासाठी १,८०० कोटी रुपयांना मंजुरी

पुढील लेख
Show comments