मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मागोवा 2012
Written By वेबदुनिया|

2012 मधील टॉप 10 भारतीय

यंदाच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग थोडा मंदावला असला तरी श्रीमंत भारतीयांच्या एकूण संपत्तीत मात्र वाढच झाल्याने दिसून आले. ही एकत्रित वाढ 3.7 टक्क्यांची होती. गेल्या वर्षी या श्रीमंतांची एकत्रित संपत्ती 241 अब्ज डॉलर्सची होती तर यावर्षी ती 250 अब्ज डॉलर्स झाली. फोर्ब्सच्या यादीनुसनार यावर्षाचे टॉप टेन श्रीमंत भारतीय असे....

1. मुकेश अंबानी

WD

रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षी या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. सलग तीन वर्षे त्यांच्या संपत्तीत काही घट येऊनही ते या स्थानावर कायम राहिले आहेत. यंदा त्यांची संपत्ती 21 अब्ज डॉलर्स होती.

2. लक्ष्मी मित्तल

WD

स्टील आयकॉन मित्तल यांना फ्रान्समध्ये मोठ्या व्यावसायिक संकटाचा सामना करावा लागला. त्यांच्या 'आर्सोलर मित्तल' कंपनीच्या शेअर्सवरही यंदा दबाव होता. मात्र यावर्षीही ते 16 अब्ज डॉलर्स संपत्तीसह या यादीत दुसर्‍या स्थानावर राहिले.
3. अझिम प्रेमजी

WD

'विप्रो'चे संस्थापक अझिम प्रेमजी आपल्या 12.2 अब्ज डॉलर्स संपत्तीसह यादीत तिसर्‍या क्रमांकावर राहिले. यंदा त्यांच्या या आयटी कंपनीचे शेअर्स आऊटसोर्सिंगमुळे फ्लॅट राहिले असले तरी प्रेमजी यांच्या संपत्तीवर परिणाम झाला नाही.
4. पालनजी मिस्त्री

WD

शापूरजी पालनजी ग्रुपचे अध्यी पालनजी मिस्त्री यांची संपत्ती यंदा 9.8 अब्ज डॉलर्स होती. त्यांचे चिरंजीव सायरस मिस्त्री हे रतन टाटा यांचे वारसदार आहेत.
5. दिलीप संघव

PR

सन फार्मास्युटिकल्स या देशातील औषध उत्पादक कंपनीचे संस्थापक व कार्यकारी संचालक दिलीप संघवी यांची संपत्ती 9.2 अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच वर्षात 45 टक्क्यांनी वृद्धी झाल्याने त्यांचा प्रथमच या यादीत समावेश झाला.
6. आदी गोदरे

PR

115 वर्षांच्या गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदी गोदरेज यांची संपत्ती यंदा 9अब्ज डॉलर्स होती. मुंबईतील 3,500 एकरातील इस्टेटीच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांच्या कुटुंबाची संपत्तीही वाढली आहे.
7. सावित्री जिंदाल

WD

ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा व सज्जन जिंदाल यांच्या मातोश्री असलेल्या सावित्री जिंदाल यांची संपत्ती यंदा 8.2 अब्ज डॉलर्स इतकी होती. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत 1.3 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
8. शशी आणि रवी रूईया

WD

इस्सार ग्रुप या आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहाच्या शशी आणि रवी रूईया यांची एकत्रित संपत्ती होती 8.1 अब्ज डॉलर्स.
9. हिंदुजा बंधू

WD

चार हिंदुजा बंधुंची यंदाची एकत्रित संपत्ती होती 8 अब्ज डॉलर्स. श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक अशी त्यांची नावे. अशोक लेलँड ही त्यांची सर्वात मोठी कंपनी.
10. कुमार मंगलम बिर्ला

PR

देशातील सर्वात लहान वयाच्या अब्जाधीशांपैकी हे एक. त्यांची संपत्ती सरत्या वर्षी 7.8 अब्ज डॉलर्स इतकी होती.