शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Updated : रविवार, 19 जून 2022 (16:48 IST)

वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर

fathers day
आभाळास एका वाक्यात काय बांधावे,
आपल्या वरती असलेल्या छत्र छायेस काय समबोधा वे! 
वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर,
आश्वासक छत्र मायेचं, असतं की आपल्या वर,
कधीही पोरकं करत नाही हे आपल्यास,
सतत देतच राहतो, हाच त्याचा ध्यास,
माता धरित्री समान, अन पिता आपलं आभाळ,
दोघेही मिळून करतात आपला सांभाळ,
अशी ही आभाळ माया असावी लागते प्रत्येकावर,
बोलून दाखवले नाही त्यांनी तरी प्रेम असते साऱ्या वर,
मुकं रडते बर हे आभाळ कधी कधी,
पण व्यक्त होत नाही ते धरित्री परी,
होतात यातना त्यांस ही खूप ,सहन करतो,
हसत हसत येणारे आव्हान तो पेलतो,
स्वतः स काय हवंय ते विसरून जातो,
कुटुंब म्हणजेच श्वास त्याचा, तो तेच जगतो,
बोलबाला होतं नाही त्याच्या करण्याचा खूप,
कठोरपणा च बिरुद असतं न मागे,म्हणून तो चूप,
पण आम्ही नाही विसरणार, मोल आपल्या आभाळच,
धरा परी प्रिय तो आम्हास, हेच फळ आमचं!
....अश्विनी थत्ते.