पुराणामध्ये या 5 जणांना वडीलांचा मान देण्यात आला आहे
पुराणामध्ये या 5 जणांना वडीलांचा मान देण्यात आला आहे
1. जनिता चोपनेता च, यस्तु विद्यां प्रयच्छति।
अन्नदाता भयत्राता, पंचैते पितरः स्मृताः॥
या 5 जणांना वडील म्हटले आहे. जन्म देणारा, मुंज करणारा, ज्ञान देणारा, अन्न दाता, आणि भयत्राता- चाणक्य नीती.
2 न तो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम्।
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिपा॥
वडिलांची सेवा करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यापेक्षा कोणतेही धर्माचे आचरण नाही -वाल्मिकी (रामायण, अयोध्याकांड ).
3 दारुणे च पिता पुत्रे नैव दारुणतां व्रजेत्।
पुत्रार्थे पदःकष्टाः पितरः प्राप्नुवन्ति हि॥
मुलगा दुष्ट स्वभावाचा असल्यास एक पिता त्याचाशी कठोर होऊन वागू शकत नाही. कारण मुलांसाठी वडिलांना बरेच कष्ट सोसावे लागतात. हरिवंश पुराण (विष्णु पर्व).
4 ज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति।
त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः॥
थोरला भाऊ, वडील आणि ज्ञान देणारा गुरु हे तिन्ही धर्म मार्गावर अटळ राहणाऱ्या पुरुषांसाठी वडीलधारी मानले आहे. - वाल्मिकी (रामायण, किष्किंधा कांड).