शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2016 (16:29 IST)

आरोग्य सुधारतील गुलाबी रंगांच्या मेणबत्त्या

फेंगशुईमध्ये मेणबत्त्यांचा प्रकाश आणि रंगांचे वेगळेच महत्त्व आहे. मेणबत्तीचा प्रकाश फक्त कँडल लाइट डिनरसाठीच नव्हे तर याच्या प्रकाशाने तुम्ही तुमचे नशीब देखील बदलू शकता.   
 
फेंगशुईत मानले जाते की मेणबत्त्यांचा प्रकाश तुमचे घर किंवा प्रतिष्ठानातील नकारात्मक ऊर्जेला दूर करतो.  
 
मेणबत्त्यांसोबत यांचा रंग देखील तुमच्या जीवनावर खास प्रभाव टाकतो. गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश मनाला आनंद देण्यासारखा असतो. फेंगशुईत गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश रुग्णांच्या आरोग्यासाठी उपयोगी असतो.     
 
फेंगशुईनुसार लाल रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमची लव्ह लाईफ फार चांगली बनू शकते. पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडू शकतो. आपल्या ऑफिस किंवा व्यापारिक प्रतिष्ठानात पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांनी प्रकाश केला पाहिजे.  
 
जर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साहाचा संचार होऊ शकतो.  
 
हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यातील आत्मविश्वासात वाढेल. आम्ही नेहमी घरात पांढर्‍या रंगांच्या मेणबत्त्यांचे प्रयोग करतो. फेंगशुईमध्ये मानले जाते की पांढर्‍या रंगांचा प्रकाश तुम्हाला निराशाकडे ढकलतो. सोनेरी अर्थात गोल्डन रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो.