शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

घर सजवा पानाफुलांनी

घर सजवा पानाफुलांनी
ND
चिनी वास्तुशास्त्राचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रत्येक घरामध्ये फेंगशुईच्या वस्तूंनी महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. घरे झाडाझुडपांनी सजविली जात आहेत. घर सजविण्यासाठी बॉन्साय व कॅक्टसचा वापर केला जात आहे. तसेच रंगीत पाने असलेल्या व ऋतूनुसार फुले येणाऱ्या रोपट्यांची निवड केली जाते. ही रोपे लावत असताना काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. बॉन्साय रोपट्याने घरात नकारात्मकता वाढते त्याचवेळी राजस्थानसारख्या वाळवंटात वाढणारे कॅक्टस हे काटेरी झुडूप घरात शांतता प्रस्थापित करते.

काही वास्तू शास्त्रज्ञांनी असे ही सांगितले आहे, की पिंपळाचे रोपटे घरात लावले तर वास्तू दोष निघून जातो. मात्र, काही वास्तू शास्त्रज्ञांनी याला विरोध केला असून पिंपळाचे रोपटे घरात लावणे निषिद्ध मानले आहे. हे रोप लावायचे असल्यास त्याची जागा निश्चित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ND
प्रत्येक घरात लावले जाणारे रोपटे म्हणजे तुळस. तुळस कल्याणकारी व आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे तिला भारतीय संस्कृतीत व आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तुळस घराच्या पूर्व-उत्तर दिशेच्या ईशान्य कोपर्‍यात लावणे शुभ मानले जाते. घरात लावलेल्या रोपट्याच्या मानाने तुळशीचे रोपटे उंच जागी ठेवले गेले पाहिजे.

रंगीत फुले व पाने असलेल्या रोपट्यांनी घर सजविण्यापूर्वी ज्योतिषाकडून सल्ला घेतला पाहिजे. कारण ही फुलझाडे राहू, केतू, शनी, मंगळ यांचे प्रतिनिधित्व करतात.

घर सजवताना सर्वांत आधी ऋतूनुसार फुले देणारी रोपटे लावली पाहिजेत. फुलझाडे लावताना ती धातूच्या भांड्यात लावली पाहिजेत. कारण धातूच्या भांड्याला चिनी वास्तुशास्त्रात महत्त्व आहे. तसेच सुगंधी रोपटे घरात प्रसन्न वातावरण पसरवितात.