गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

तीन पायांचा बेडूक

तीन पायांचा बेडूक
ND
चीनी वास्तुशास्त्रात तीन पायाच्या बेडकाला खूप महत्त्व आहे. तीन पायाच्या बेडकाची मूर्ती घरात ठेवल्याने ती लाभदायी ठरते. बाजारात गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानात शोकेसमध्ये एक किंवा तीन नाणे तोंडात धरलेला तीन पायांचा बेडूक ठेवलेला दिसतो. या तीन पायांच्या बेडकाचे घरातील स्थान खूपच महत्त्वाचे मानले जाते.

बेडकाची मूर्ती ही घराच्या मुख्य दरवाज्यासमोर घराच्या आत अशा पद्धतीने ठेवावे की, बेडूक धन घेऊन घरात प्रवेश करत आहे. बेडकाला मुख्या दरवाज्यासमोर बाहेरच्या दिशेने कधीही ठेवू नये कारण त्याच्या तोंडात नाणे असल्याने घरातील धन बाहेर जाण्याचे प्रतीक आहे. तीन पायांच्या बेडकाची मूर्ती ही दिवाणखान्यातच ठेवली पाहिजे.